हा वेगळाच लोचा! कोकणच्या जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं भलतंच सत्य समोर
कोकणच्या जंगलात अमेरिकन महिला साखळीत बांधलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही महिला कोकणच्या जंगलात पोहोचली कशी, तिला तिथं कुणी आणि का बांधून ठेवलं? असे एक ना दोन कितीतरी प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला. महिलेनं जबाबात आपल्या नवऱ्याने आपली अशी अवस्था केल्याचं सांगितलं. पण त्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणाचं भलतंच सत्य समोर आलं. सावंतवाडीच्या रोनापाल-सोनुर्ली जंगलात ही अमेरिकन महिला साखळीनं बांधलेल्या अवस्थेत सापडली. आठवडाभर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. या तपासात धक्कादायक सत्य समोर आले आहेत. त्या महिलेने दिलेला जबाब आणि त्यानुसार आणि त्याच दिशेने पोलिसांनी केलेल्या अतिशीघ्र तपासामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या
मुंबई, दिल्ली, गोव्यात महिलेचं वास्तव्य या महिलेने गोवा इथं काही हॉटेलवर वास्तव्य केलं. तसंच मुंबई, दिल्ली इथं तिचं वास्तव्य आढळून आले. दिल्लीमध्ये तिच्या नावावर एक वाहन आहे. तिने महिनाभरापूर्वी विरार येथील दुकानातून टेंट विकत घेतला. तो विकत घेतानादेखील ती एकटीच गेली होती, हे येथील सीसीफुटेजवरून आढळून आलं. गोवा येथील वास्तव्यातही तिचा एकटीचाच वावर आढळून आला. यावरून तिच्यासोबत कुणीच नसल्याचे निदर्शनास येत आहे.

Comments
Post a Comment