त्रस्त प्रवाशांच्यावतीने दीपक मा. चव्हाण (कार्याध्यक्ष ) गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ. मुंबई.
मान. एकनाथ शिंदे साहेब,
. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
महोदय,
. आपण सणासुदिला *"आनंद शिधा "* देऊन आमच्या आंनदात सहभागी होत असता. *माझी लाडकी बहीण* ह्या सारख्या अनेक योजना आणून सर्वसामान्य जनतेच्या घरा-घरात पोहचलात. सर्वसामान्य जनतेला आपला कैवारी, आपला हक्काचा माणूस भेटल्याचे समाधान मिळत होते, आपल्या *लाडक्या बाप्पाचा सण* साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून *गौरी-गणपती सणापूर्वी* दोन महिन्यापासून ते दोन दिवस अगोदर अनेक रेल्वे गाड्या जाहीर केल्या, नियोजन केले, गणेशभक्तांना आनंद झाला, उत्साहाने आप -आपली तिकिटे आरक्षित करु लागले. जाहीर केलेल्या रेल्वे गाड्या काही मिनिटातच फुल होऊ लागल्या. प्रत्यक्ष कीती गणेशभक्त प्रवाश्याना तिकिटे मिळाली हा संशोधणाचा मुद्दा होऊ शकतो. ज्या *गणेशभक्त प्रवाश्यांची* प्रवासाची गैरसोय होते त्यांच्या प्रवासाची सोय कितीही अडचणी आल्यातरी गेली अनेक वर्षे सातत्याने *एस. टी. महामंडळ* करते, (याचे आम्ही गेल्या ४० पेक्षा जास्त वर्षाचे साक्षीदार आहोत.) त्याप्रमाणे ह्या वर्षीही ग्रुप पद्धतीने जादा गाड्यांचे नियोजन केले, वैयक्तिक आरक्षणाच्या गाड्यांचेही नियोजन केले. अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी एस. टी. गाड्या आरक्षित करून अनेक *गणेशभक्त प्रवाश्यांची मोफत प्रवास व्यवस्था केली,* पूर्व सूचना देऊन ०३/०९/२०२४ रोजी एस. टी. कर्मचाऱ्यांचा सम सुरु झाला, तरीही ०३/०४/२०२४ व ०४/०८/२०२४ रोजी एस. टी. गाड्या सुटल्या, त्या करिता एस. टी. वरिष्ठ अधीकारी ते कर्मचारी यांनी फार मेहनत घेतली हे आम्ही प्रत्यक्ष पहिले आहे. गणेशभक्त प्रवाश्याना प्रवास संदर्भात विशेष झळ पोहचली नाही, एस. टी. गाड्यावर आपली छब्बी (फोटो ) असलेले नामफलक पाहून आम्हाला प्रवाश्याना आपला *गौरी-गणपती सणातील प्रवास* निर्विघ्नपणे पार पडेल अशी आमची खात्री झाली. पण क्षणभगूर ठरली. दिनांक ०५/०९/२०२४ रोजी प्रवाश्यांचे जे हाल झाले ते *न भूतो न भविष्यनती* असेच होते. म्हणून हा पत्र प्रपंच.
. आमच्या प्रवासी संघाच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षा पेक्षा जास्त वर्षे गौरी - गणपती सणास सातत्याने एस. टी. महामंडळाच्या सहकार्याने ग्रुप गाड्यां आरक्षित करतो, तसेच एस. टी. गाड्या आरक्षित होण्यापूर्वी ते एस. टी. गाड्या सुटेपर्यंत आम्ही एस. टी. वरिष्ठ अधिकारी ते एस. टी. आगारातील अधिकारी यांच्या संपर्कात असतो, चर्चा करीत असतो. श्यक्य असेल त्या प्रमाणे शासनच्या संपर्कात असतो. म्हणूनच अधिक जबाबदारीने भाष्य करु शकतो.
. एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप होण्यापूर्वी, संप काळात आणि संप मागे घेतल्यावरही, एस टी. वरिष्ठ अधिकारी यांच्या संपर्कात राहून चर्चा करीत होतो. ०४/०९/२०२४पर्यंत प्रवासाबाबत विशेष अडचण होणार नाही, अशी प्रवांश्याप्रमाणे एस. टी. महामंडळाला अपेक्षा होती, त्या प्रमाणे प्रवाशांची विशेष गैरसोय झाली नाही. पण ०३/०९/२०२४ रोजी संपा संदर्भात शासनाने तोडगा काढला नाहीतर प्रवाश्यांची अत्यंत गैरसोय होणार अशी भीती प्रवांश्याप्रमाणे एस. टी. महामंडळाला होती. ती खरी ठरली.
संपावर ०४/०९/२०२४ रोजी रात्रौ शासनाने जो निर्णय घेतला तो निर्णय दिनांक ०३/०९/२०२४ रोजी घेतला असता तर एस. टी. गाड्याबाबत गोंधळ झाला नसता. याला एस. टी. महामंडळापेक्षा शासन जास्त जबाबदार आहे हे आमचे ठाम मत आहे. आता कोण दिलगिरी व्यक्त करणार हे पाहायचे आहे.
. दर वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात गाड्या आरक्षित करण्यात आल्या, त्या प्रमाणात सुस्थितील एस. टी. गाड्या उपलब्ध होऊ शकल्या नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या ७/ ८ वर्षात नवीन एस. टी. गाड्यांची
खरेदी झालेली नाही. यांची जबाबदारीकोण स्वीकारणार? आम्हाला माहिती नाही?. पण प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले ही वस्तुस्थिती आहे. त्यात काही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी गाड्या मिळविण्यासाठी घातलेला गोंधळ. एस. टी. अधिकाऱ्यांच्या हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळण्यासाठी अनेक डेपोत पोलीस यंत्रणेला हस्तक्षेप करावा लागला. हे एस. टी. महामंडळाला, राज्य शासनाला भूषणवाह नाही.
. दुसरे कारण म्हणजे *गेली अनेक वर्षे रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग* मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राजकीय नेते, मंत्री यांनी बऱ्याच वेळा पहाणी दौरे केले. सर्व सामान्य जनतेने विनंती अर्ज दिले,
कित्येक धरणे, आंदोलने केली, १५ ऑगस्ट २०२४ पासून सतत ६ दिवस प्राणान्तिक उपोषण केले, तरीही महामार्ग पूर्णतःवाकडे का जात नाही? हे आमच्या बाप्पाला माहित.
ह्या सर्वात अतोनात हाल झाले ते सर्व सामान्य जनतेचे. गाडीची प्रतीक्षा करण्यासाठी १०/१२ तास गेले. प्रवासात किमान २०/२५ तास गेले. यांची कोणाला जाणीव होती का? आता आम्ही कोणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाही. कृपया आमच्या निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करावा ही आमच्या लाडक्या बाप्पाकडे प्रार्थना!
आपला
त्रस्त प्रवाशांच्यावतीने
दीपक मा. चव्हाण
(कार्याध्यक्ष )
गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ. मुंबई.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment