रोहित शर्माचं रेकॉर्ड उद्ध्वस्त, इंग्लिश खेळाडूच्या रडारवर आता विराट कोहली!


    सध्या इंग्लंड आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान टेस्ट सीरिज सुरू आहे. या सीरिजमधली दुसरी मॅच लॉर्ड्स मैदानावर खेळवली जात आहे. या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जो रूटने विक्रमी कामगिरी केली आहे. जो रूट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंपैकी सर्वाधिक शतकं करणारा दुसरा बॅट्समन ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टपूर्वी तो तिसऱ्या क्रमांकावर होता.  त्याने लॉर्ड्सवर आपल्या टेस्ट कारकिर्दीतलं 33वं शतक झळकावून एकूण शतकांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं. त्याने भारताचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकलं आहे.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विशेष विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 80 शतकं झळकावली आहेत. त्याच्यानंतर रूटचा क्रमांक लागतो. रूटच्या खात्यात आता एकूण 49 शतकं जमा झाली आहेत. अगोदर रूट आणि भारताचा स्टार बॅटर रोहित शर्मा दोघेही 48 शतकांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर होते. काल रूटने शतक झळकावून रोहितला मागे टाकलं. ‘हिटमॅन’ सध्या 48 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Comments