रत्नागिरीत भाजयुमोतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरीत भाजयुमोतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद
मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो रत्नागिरी द. जिल्ह्यातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात झाले. शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी रक्तदान शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या. शिबिराला महिला, युवक - युवती यांचा विशेष प्रतिसाद लाभला. ३८ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. या वेळी रत्नागिरी दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, शहराध्यक्ष राजन फाळके, रत्नागिरी द. भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, स्वप्नील गोठणकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक शिंदे उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या अधिकारी- वर्गाचे सहकार्य केल्याबद्दल युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.
Comments
Post a Comment