*गणेशोत्सव या वर्षी कसा गेला? :- मागोवा*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

 *गणेशोत्सव या वर्षी कसा गेला? :- मागोवा*

▪️या वर्षी गणपती उत्सवाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली.. मुंबई, पुणे, येथील चाकरमान्याची कोकणात या वर्षी या आधी जेवढी उपस्थिती नव्हती त्याही पेक्षा जास्त गर्दी ह्या वर्षी दिसून आली..जमेची बाजु म्हणजे थोडा फार अपवाद वगळता पावसाने सुद्धा चांगली साथ दिली. त्यामुळे चांगली रंगत ह्या सणाला दिसून आली.

▪️खरतर मुंबई वरून येताना व पुन्हा मुंबईला जाताना सर्व हॉटेल मधील नाष्टा असेल, दुपारचे जेवण असेल ते ही संपले होते त्यामुळे बऱ्याच जणांना चहा बिस्कीट ह्या वरतीच समाधान मानावे लागले..
तसेच सर्व CNG पंपामध्ये सुद्धा प्रचंड रांगा लागल्या होत्या तर बऱ्याच पंपंचा cng संपला होता त्यामुळे पेट्रोल विक्रीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन आले.

▪️तसेच ग्रामीण भागातील दुकानदारांकडून अशी माहिती मिळाली की दर वर्षी जेवढा विक्री साठी किराणा ठेवतो , किंवा भाजी असेल, फळ, फुल, इतर मिठाई, मोदक हे सर्व साहित्य पहिल्या काहीच दिवसात  संपले असुन नव्याने माल भरावा लागला तरीही विक्री बंपर होतच होती. रिक्षा व्यावसायिक सुद्धा अतिशय खुश होते कारण त्यांना भाडी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाली असुन त्यामध्ये ही बऱ्याच ग्राहकांना रिक्षा उपलब्ध होत नव्हत्या. तर  जवळचे मुंबई वाले ग्राहक चालत जाताना दिसत होते.
  
▪️यामध्ये एस टी बस सुद्धा फुल भरुन जाताना दिसत होत्या.एकंदर  गणपतीचे वातावरण सर्व स्तरांमध्ये दिसत होते.सर्व बाजार पेठांनी गर्दीचा उच्चांक गाठला होता.
   
▪️तसेच प्रत्येक गावात महिला भगिनी त्यांचे झिम्मा फुगडीचे, गोप विणण्याचे नाच पथक आपले साहित्य म्हणजेच ढोलकी, झांज व एकाच कलर च्या साड्या परिधान करून नटून थटून काही ठिकाणी चालत तर काही ठिकाणी बोलेरो गाडी मधुन जाताना दिसत होत्या... तसेच शक्ती तुरा नाच वाले असतील किंवा भजन मंडळी असतील त्यांची सुद्धा लगबग दिसुन येत होती, मुंबई करांच्या खास एकाच वाडी साठी आलेल्या एस्टी बस दिसत होत्या तर नाक्या नाक्यात शुभेच्छांचे बॅनर सुद्धा अतिशय भक्ती भावाने लावल्याचे दिसुन आले.
  
▪️या वर्षी पूर्वा नक्षत्र मध्ये गौरी आल्याने नववधू चे ओवसे भरण्यात आले होते त्यामुळे सासर हुन माहेरी गौरीचा ओवसा घेवुन जाणाऱ्या माहेरवाशिणी बऱ्याच ठिकाणी दिसत होत्या.तर मुंबई करांच्या भेटी गाठी सुद्धा गाववाल्याकडे चालु होत्या. 
 
▪️एकंदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गजानन येणाऱ्या काळात सुख समृध्दी, आणि प्रगतीचे आशिर्वाद सर्वांना देऊन गेल्याचे प्रत्येकात दिसुन येत होते.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments