कोकणवासियांसाठी आनंदवार्ता! वांद्रे ते मडगाव नवीन एक्स्प्रेस सुरू, असं आहे वेळापत्रक
मुंबई: मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वांद्रे टर्मिनसहून मडगावसाठी नव्याने ट्रेन सुरू झालीय. 29 ऑगस्ट रोजी बोरिवली मडगाव जंक्शन येथून नवीन गाडीचा शुभारंभ झाला आहे. विशेष म्हणजे तब्बल 170 वर्षानंतर पहिल्यांदाच वसई पनवेल करून ट्रेन कोकणात जाणार आहे. पश्चिम रेल्वेने सुरू केलेली ही ट्रेन कायमस्वरुपी आठवड्यातून दोन दिवस असेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना या ट्रेनचा फायदा होणार आहे.
आठवड्यातून दोन दिवस धावणार ट्रेन
वांद्रे टर्मिनल ते मडगाव जंक्शन ही गाडी वांद्रे येथून बुधवार आणि शुक्रवारी सुटेल तर मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सुटेल. मडगाव जंक्शन वांद्रे टर्मिनल (10116) आणि वांद्रे टर्मिनल मडगाव जंक्शन (10115) या क्रमांकाने या नवीन गाड्या धावणार आहेत. ही गाडी वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, बीड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि करमाळी या स्थानकावर थांबेल. तर खेडला देखील थांबा दिला जावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment