रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी आबलोलीच्या सौ. स्नेहल सचिन बाईत यांची निवड.
गुहागर: समस्त आबलोली करांसाठी एक अभिमानास्पद यश प्राप्त झालेले आहे .सौ स्नेहल सचिन बाईत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सौ स्नेहल बाईत या चौंडेश्वरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन देखील राहिलेल्या आहेत.तसेच विद्यमान संचालिक देखील आहेत . तालुक्यातील नावाजलेली शिक्षण संस्था लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेच्या देखील त्या विद्यमान संचालिका आहेत. आबलोली खोडदे विविध कार्यकारी सोसायटी ,शेळी मेंढी पालन संस्था असेल, कुक्कुट पालन संस्था असेल ,रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात उत्पादक सहकारी संस्था असेल अशा विविध संस्थेवर त्या संचालक म्हणून कार्यरत आहेत . तसेच आबलोली ग्राम पंचायतीच्या त्या उपसरपंच म्हणून देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला होता. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटनामध्ये जसे की सहकार ,शिक्षण यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची ही पोचपावती म्हणावी लागेल.त्या आबासाहेब बाईत यांच्या सून व सचिन बाईत कार्याध्यक्ष लोकशिक्षण मंडळ आबलोली यांच्या सौभाग्यवती, संस्थापक अध्यक्ष चंद्रकला फाउंडेशन तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत त्यांची सहकार शिक्षण व सामाजिक कार्यामध्ये घोडदौड चालू आहे . निश्चितपणाने सहकार पॅनलच्या माध्यमातून त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना जिल्ह्याच्या इतक्या मोठ्या संस्थेच्या उपसभापती निवड ही सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे .त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Comments
Post a Comment