राजापूर तालुक्यातील गोवळ गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी अनिल अनंत शेवडे यांची निवड

राजापूर तालुक्यातील गोवळ गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी अनिल अनंत शेवडे यांची निवड
 
राजापूर तालुक्यातील गावळ गावच्या तंटामुक्तच्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून गोवळ गावातील सुशिक्षित, शेतीचे पुरस्कार प्राप्त आधुनिक शेतकरी, हुशार, निर्भीड स्पष्टवक्ते सामाजिक क्षेत्रात अनुभवी असणारे अनिल अनंत शेवडे यांची ग्रामसभेमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.
शेवडे यांची गोवळ तंटामुक्त कमिटी च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यावर गोवळ गावचे सरपंच अभिजीत कांबळे यांनी शेवडे यांचे ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर, पाणी कर्मचारी गावातील सर्व कर्मचारी पोलीस पाटील शिक्षक आणि गोवळ च्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त तंटामुक्त अध्यक्ष अनिल शेवडे यांचे अभिनंदन केले व पुढील उत्तम कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments