*जंगलात हरवलेलं मांजर १२८८ किलोमीटर प्रवास करून परतलं घरी! वाचा, नक्की काय घडलं?*
*जंगलात हरवलेलं मांजर १२८८ किलोमीटर प्रवास करून परतलं घरी! वाचा, नक्की काय घडलं?*
*कल्पना करा एक कुटुंब आपल्या लाडक्या मांजरीला घेऊन घरापासून दूर फिरायला गेले आणि तिथे त्या मांजरीची आणि कुटुंबाची ताटातूट झाली. घरापासून दूर अनोळख्या ठिकाणी असलेले मांजर घरी कसे परतणार?*
▪️पण, अखेर एक दिवस ते मांजर त्याच्या कुटुंबाच्या घरी पोहचते. कसे ते कोणालाही माहित नाही. हरवलेलं मांजर पाहून कुटुंबातील कोणालाही विश्वास बसत नाही. तुम्हाला वाटलं असेल की,ही एखाद्या चित्रपटाची कथा आहे पण नाही ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. कॅलिफोर्नियातील एका कुटुबांबरोबर खऱ्या आयुष्यात ही घटना घडली आहे.
*जंगलात हरवली मांजर*
▪️कॅलिफॉर्नियमध्ये राहणारे बेनी आणि सुझॅन अँगुआनो आपल्या लाडक्या मांजरीना घेऊन यलोस्टोन नॅशनल पार्कच्या जंगलात जूनमध्ये कॅम्पिंग ट्रिपला गेले होते. त्यावेळी त्यांचे लाडके मांजर काहीतरी पाहून घाबरले आणि जंगलातील झाडींमध्ये जाऊन लपले. दोघांनी फिशिंग ब्रिज आर.व्ही. येथे त्यांच्या कॅम्प ग्राउंडजवळील जंगलात पाच दिवस आपल्या मांजराचा शोध घेतला पण तेव्हा ते त्यांना सापडले नाही. बेनी आणि सुझॅनला वाटत होते की,”आता ते आपल्या लाडक्या मांजरीला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही.”
▪️सयामीज प्रजातीच्या या मांजराचे नाव रेन ब्यू असे आहे. त्याचे वय फक्त २ वर्ष आहे. रेन ब्यू आणि त्याची बहीण स्टार जेव्हा ११ आठवड्यांचे होते तेव्हा ते बेन आणि सुझॅन जोडपे यांना भेटले. तेव्हा या जोडप्याने त्यांचे पालनपोषण करण्याचा आणि नंतर त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. “स्टार ही मांजर खेळकर होती पण तिच्या तुलनेत रेन ब्यू मात्र सुरुवातीला भित्रा वाटत होता, त्याने पटकन आपल्या नवीन घरातील वातावरणाबरोबर जुळवून घेतले.” असे सुझॅन यांनी सांगितले.
*८०० मैलांचा प्रवास करून मांजर परतलं घरी*
▪️सुझॅन यांनी सांगितले की, “यलोस्टोन नॅशनल पार्कच्या जंगलातील ट्रिपमध्ये रेन ब्यूची बहीण स्टार देखील त्यांच्याबरोबर होती. जेव्हा रेन ब्यू मांजर जंगलात हरवली तेव्हा स्टार अस्वस्थ झाली होती. अखेरीस हृदयावर दगड ठेवून बेन आणि सुझॅन यांनी सॅलिनास येथे कॅलिफोर्नियाच्या घरी परत जाण्याचा कठोर निर्णय घेतला. आपल्या लाडक्या मांजरीला सोडून जावे लागेल याची कल्पनाही बेन आणि सुझॅन यांनी कधीही केली नव्हती. सुझॅन म्हणाली की, मी रेन ब्यूला सोडून जात आहे असे मला वाटत होते. स्टार कधीही रेन ब्यूपासून दूर राहिली नव्हती, घरी परत येताना संपूर्ण रस्ता रेनब्यूसाठी व्याकूळ झाली होती.
▪️सर्व प्रकरणाने वळण तेव्हा घेतले जेव्हा यलोस्टोनच्या जंगलामध्ये हरवलेली मांजर कॅलिफोर्नियामध्ये परत आली. जवळजवळ दोन महिन्यांनंतर कॅलिफोर्नियातील रोझविलेच्या रस्त्यावर रेन ब्यूच्या भटकताना दिसली. KSBW या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार,” रोझविले हे बेनी आणि सुझॅन राहतात त्या ठिकाणापासून उत्तरेकडे तीन तास दूर होते तर यलोस्टोन नॅशनल पार्कपासून जवळपास ८०० मैल म्हणजेच १२८८ किलोमीटरपेक्षा दूर होते.”
*अशी झाली आपल्या कुटंबासह मांजरी पुन्हा भेट*
▪️रेन ब्यूला वाचवणाऱ्या एका महिलेने तिला पाळीव प्राण्यांची काळजी घेणार्या स्थानिक सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स या संस्थेच्या रोझविले येथील शाखेकडे सोपवले. रेन ब्यूच्या शरीरात असलेल्या मायक्रोचिपच्या मदतीने या संस्थेने बेन आणि सुझॅनबद्दल माहिती मिळवली.
▪️हे सर्व प्रकरण बेन आणि सुझॅन यांना तेव्हा समजले जेव्हा संस्थेच्या एका कर्मचाऱ्याने रेन ब्यू सापडल्याचे त्यांना कळवले. आपले लाडके मांजर कॅलफॉर्नियामध्ये परत आले आहे यावर त्यांचा विश्वासच बसला नाही, ही बातमी ऐकून खरं तर बेन आणि सुझॅन यांना धक्काच बसला होता.
▪️जेव्हा हे जोडपे जेव्हा आपल्या पुन्हा भेटले एकत्र आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, रेन ब्यूने त्याच्या शरीराचे वजन ४० टक्के कमी झाले होते. तो प्रथम अस्वस्थ होता, परंतु जेव्हा त्यांनी त्याला कारमध्ये सोडले तेव्हा तो शांत झाला. “तो खूप थकला होता.त्याने फक्त माझ्याकडे पाहिले, आणि मग त्याने आपले डोके खाली केले आणि फक्त झोपी गेला,” सुझॅन अँगुआनो यांनी सांगितले.
▪️आपल्या लाडक्या मांजरीपासून दूर असलेल्या बेन आणि सुझॅन हा दोन महिन्यांचा काळ अत्यंत अवघड होता. रेन ब्यु कशी असेल याची चिंताच त्यांना राहून राहून सतावत होती. रेन ब्यूने यलोस्टोन ते रोझव्हिल असा ८०० मैल म्हणजेच १२८८ किलोमीटरचा प्रवास नेमका कसा केला हे एक गूढ आहे.
▪️जोडप्याने सांगितले की, “रेने ब्यू ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून घरी परतली आहे आणि आता तिची प्रकृती चांगली आहे. सुझॅन अँगुआनो तिच्या मांजरींबरोबर पुन्हा प्रवास करण्यास संकोच करत आहे, परंतु जर पुन्हा प्रवास केला तर घरापासून इतके दूर जाणार नाही नाहीत.”
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment