*गणपती विसर्जनाच्या वेळी बुडणाऱ्या पाच जणांना सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*गणपती विसर्जनाच्या वेळी बुडणाऱ्या पाच जणांना सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान*

▪️गुहागर येथील समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षा रक्षकांनी वाचवले. समुद्रात दोरखंड टाकून या सुरक्षारक्षकांनी या पाचजणांना वाचवले.

▪️ही घटना गुरुवारी सायंकाळी गौरी-गणपती विसर्जनाप्रसंगी घडली. गुहागर नगरपंचायतीचे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षा रक्षकांमळे माेठा अनर्थ टळला.

▪️गुरुवारी १२ सप्टेंबरला सायंकाळी दुर्गादेवी वाडीतील गौरी-गणपतीची मिरवणूक दुर्गादेवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर आली. भक्तिभावाने गौरी- गणपतीची समुद्रावर सामूहिक आरती झाली. त्यानंतर एकेकजण गणपतीची मूर्ती घेऊन समुद्रात विसर्जनासाठी जाऊ लागले. गणेश मूर्तींचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच पाच तरुण एका लाटेने खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावरुन समुद्राचे निरीक्षण करणाऱ्या आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधून तो खोल समुद्रात भिरकावला. समुद्रात अडकलेल्या तरुणांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली

▪️प्रथम दोरखंडाला बांधलेला बोया दोघांच्या हाती लागला. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी या दोन तरुणांची धडपड सुरु होती. त्याचवेळी आणखी एक लाट आली आणि उर्वरित तीन सहकारीही बोयाच्या जवळ आले. पण तोपर्यंत बोयाला बांधलेला दोरखंड समुद्रात जाऊ लागला. किनाऱ्यावरुन दोरखंड ओढणारे चार पाच सहकारी जवळपास छातीभर पाण्यात लाटा झेलत उभे होते.

▪️जीवनमरणाच्या हिंदोळ्यावरचा हा काही क्षणांचा खेळ किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्वांचेच प्राण कंठाशी आणत होता. तितक्यातच आणखी १० - १२ जणांनी धावत जाऊन खोल समुद्रात जाणारा दोरखंड पकडला. त्यानंतर सर्वजण किनाऱ्यावर सुखरुप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्षकांचा नगरपंचायतीने शुक्रवारी सत्कार केला
   
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments