*चिपळूण हायटेक बसस्थानकाचे काम येत्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*चिपळूण हायटेक बसस्थानकाचे काम येत्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार*

आगार प्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली आमसभेत माहिती


 गेली अनेक वर्ष मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आता काही दिवसांवरती गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे. या उत्सवात  आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी यांची गर्दी होते.  काम अपूर्ण असल्यामुळे बसेस लावायला जागा सुद्धा मिळत नाही. या कामासंदर्भात आगार प्रमुख दीपक चव्हाण यांना आमसभेमध्ये विचारले असता त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली. त्यामुळे हायटेक बसस्थानकाचे स्वप्न निदान मार्चमध्ये तरी पूर्ण होईल का? असा सूर आमसभेत निघाला. 

जिल्ह्यातील चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे प्रवाशांना  चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक हे प्रवास करण्यासाठी सोयीस्कर पडते. गेले अनेक वर्ष चिपळूण बसस्थानक हायटेक होणार अशी चर्चाच रंगते आहे. हायटेक बसस्थानक  बनवण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आली. मात्र, अनेक उन्हाळे पावसाळे  गेले तरीसुद्धा चिपळूण बसस्थानकाची इमारत अजूनही पूर्ण होत नाही. ज्या ठेकेदाराने पहिल्यांदा काम घेतले. त्याने काम पूर्ण न करता तो सोडून गेला. त्यानंतर दुसऱ्या ठेकेदाराने काम सुरू केले. 

हे काम पूर्ण होण्यासाठी प्रवाशांनी आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा आंदोलने केली.  पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. मधल्या काळात हे काम पुन्हा सुरू झाले. मात्र, पुन्हा एकदा या कामाला ब्रेक लागला आहे. तो नेमका का लागला आहे ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

चिपळूण बसस्थानकातील  सध्याची स्थिती फार अवघड आहे. ग्रामीण आणि शहराकडे जाणाऱ्या बसेस लावण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे प्रवाशांची सुद्धा धावपळ होते. कुठली एसटी कुठे नेमकी लागेल याचा ठाव ठिकाण नसतो. त्यामुळे हे आगाराचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा प्रवाशी करत आहेत. मात्र, अजून किती प्रतीक्षा करावी लागणार ?  हा सुद्धा प्रश्न सतावत आहे.  

बुधवार २८ ऑगस्ट रोजी आमसभा पार पडली. या सभेत मध्यवर्ती बसस्थानकाचा प्रश्न भाजपाचे रामदास राणे यांनी उपस्थित केला. मध्यवर्ती बसस्थानकाचे  काम  कधी पूर्ण होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संदर्भातील माहिती उपस्थित आमसभेला चिपळूण आगाराचे आगार प्रमुख दीपक चव्हाण यांना विचारण्यात आली.  त्यावेळी त्यांनी बसस्थानक येत्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी  सांगितले.  आम्ही सुद्धा या कामा संदर्भात पाठपुरावा करत आहोत. या संदर्भातील पत्र व्यवहार सुध्दा करण्यात आला आहे, असे त्यांनी या आमसभेत सांगितले. 

त्यांच्या उत्तराने थोडासा दिलासा प्रवासी वर्गाला मिळाला आहे.  काही दिवसांवरतीच गणपती सण येत आहे. या गणपती सणाला कोकणामध्ये चाकरमानी  मोठ्या प्रमाणात येतात. ते एस टीला जास्त पसंती देत असल्याने आगारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.  त्यांच्या परतीच्या प्रवासाच्या वेळेला सुद्धा गर्दी असते. अशावेळी जादा गाड्या आणि नियमित सुटणाऱ्या  गाड्या लावण्यासाठी जागा कमी पडते.  प्रवासांची तारांबळ उडते. त्यामुळे त्याचे सुद्धा योग्य नियोजन व्हावे असे सूचित करण्यात आले.  हायटेक बसस्थानक बनवण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि चिपळूणवासियांना  हायटेक बसस्थानकाची सुंदर इमारत बघायला मिळावे अशा सुद्धा काही प्रवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
   
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर 
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या