*45 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या PMPML च्या इलेक्ट्रॉनिक बसला भीषण आग; पुणे- सोलापूर मार्गावर दुर्घटना*
*45 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या PMPML च्या इलेक्ट्रॉनिक बसला भीषण आग; पुणे- सोलापूर मार्गावर दुर्घटना*
▪️घोरपडी : पुणे- सोलापूर रस्त्यावरील काळू बाई चौकाजवळ ९३ अव्हेन्यू माॅलसमोर आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रॉनिक बसला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने सर्व प्रवाशांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली.
▪️धायरीहून हडपसरला निघालेली बस क्रमांक १५ (एमएच १२ एसएफ ००२६) रेसकोर्स जवळ आल्यावर बसमधील प्रवाशांना काहीतरी जळल्याचा दुर्गंध येत असल्याचा बस वाहकांना कळवले. फातिमा नगरला बस पोहचल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे सांगितले.
▪️चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला घेतली. जवळपास ४० ते ४५ प्रवाशांना खाली उतरवले. त्याच वेळी बसच्या मागच्या बाजूला थोडी आग लागली. बसमधील आग नियंत्रण यंत्र आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु यंत्र सुरू झाले नाही. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांमधून आग नियंत्रण यंत्र घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने आणखी भडका घेतला आणि काही वेळात संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली.
▪️अग्निशामक दलाची कोंढवा, बीटी कवडे रास्ता आणि हडपसर केंद्राच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यामुळे त्यांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या नीलेश लोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस इलेक्ट्रॉनिक असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता असू शकते. नेमके कारण स्पष्ट नाही. परंतु, आगीचे वृत्त समजताच तातडीने आम्ही पोहचलो आणि आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला.
▪️वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे त्याठिकाणी तातडीने पोहचल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवले, त्यामुळे काही वेळात वाहतूक कोंडी कमी झाली. अग्निशामक दलाचे नीलेश लोणकर, दीपक कचरे, मोहन सणस, रवी बरटक्के, अनुराग पाटील , कुणाल खोडे, रामराज बागल व इतर कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणली
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment