19 सप्टेंबर चलो रत्नागिरी मूलभूत मागण्यासाठी कोकणाचे पहिले भव्य आंदोलन ! जय शिवराय !
कोकणातील शेती उध्वस्त करणारी माकडांची समस्या , माकड डुक्कर आणि गवे यावर नियंत्रण.
अंबा बागायतदार व मच्छीमार संपूर्ण कर्जमाफी , विम्याचे निकष बदलणे आणि यावर्षीचे विम्याचे पैसे मिळणे
काजू बी ला दीडशे रुपये हमीभाव आणि सुपारीला पाचशे रुपये हमीभाव
कोकणाचे प्रमुख तीन उद्योग संबंधित योजना राबवण्यासाठी आंबा काजू बोर्ड महाराष्ट्र फिशरीज कॉर्पोरेशन आणि पर्यटन राज्याच्या बजेटमध्ये प्रत्येकी एक हजार कोटीची तरतूद.
सी आर झेड, पर्यटन बांधकामे, हाऊस बोट, वायनरी उद्योग, वाळू उद्योग, चिरेखाण कोकणात उद्योग करण्यासाठी स्थानिक तरुणांना 30 दिवसात परवानगी, सवलती आणि सबसिडी , शासनाच्या उद्योग योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
शिक्षक तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक क्लास थ्री आणि क्लास फोर कोकणातील 80 टक्के नोकऱ्या कोकणातील तरुणांना मिळाव्यात
याकरिता पुन्हा प्रादेशिक निवड मंडळे बनवावीत , जिल्हा बँकेने आपल्या भरतीमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्या द्याव्यात.
आंध्र प्रदेश आणि गुजरात प्रमाणे माशांची शेती हजारो कोटीचा उद्योग निर्माण करण्याकरता केंद्राच्या आणि राज्याच्या योजना कोकणात राबवण्यात याव्यात. या करता महाराष्ट्र फिशरीस कार्पोरेशन कडे दरवर्षी एक हजार कोटीची बजेट तरतूद
2023 पर्यंत ची पर्यटनाची बांधकामे मुंबईतील झोपडपट्ट्या आणि उल्हासनगर मधील अनधिकृत इमारतीप्रमाणे अधिकृत कराव्यात. आणि यापुढे पण पर्यटन बांधकामांना एक महिन्यात परवानगी मिळावी.
कोकणाला उध्वस्त करणारे धोरण शासनाने बदलावे याकरता पहिले महाआंदोलन , कोकणावरील अन्याय दूर करण्याचा शेतकऱ्यांचा मच्छीमारांचा आणि पर्यटन व्यवसायिकांचा निर्धार.
19 सप्टेंबर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय यादवराव आणि प्रकाश साळवी सहित 25 कोकणातील बागायतदार शेतकरी मच्छिमार आमरण उपोषणाला बसणार.
19 तारखेला सकाळी दहा वाजता अलंकार हॉटेल येथे सर्वांनी एकत्र या
१० ते १२. मोटरसायकल आणि कार रॅली मारुती मंदिर पर्यंत
१२ ते २. स्वायत्त कोकण मागणी परिषद
२ वाजल्यापासून पुढे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात.
कोकण विकासाचे मूलभूत 15 प्रश्न या विषयातील मागण्यांचे आश्वासन नाही जी आर निघेपर्यंत आंदोलन सुरू राहील.
गेली 75 वर्ष कोकणावर अन्याय करणारे शासनाचे धोरण यापुढे चालणार नाही. आणि यासाठी हजारो कोकण वाशीयांचे आंदोलन.
याच बरोबरीने संपूर्ण कोकणात गावागावांमध्ये आंदोलन सुरू होईल ! रस्ते पाखाड्या साकव सभामंडप यापुढे जाऊन कोकणाचा खरा विकास या संदर्भात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चा व्हावी आणि प्रत्यक्ष प्रश्न सुटावेत याकरता भविष्यात लोकप्रतिनिधींनी काम करावे याकरता आग्रह.
गावागावात वेगाने होणारी जमिनीची विक्री, बंद होणारे शाळा, बंद होणारी घर बंद होणारी शेती हे सर्व बदलायचा असेल तर सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षाचे संवेदनशील कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि कोकण प्रेमी सर्वांनी एकत्र येऊन कोकणावर होणाऱ्या अन्याय विरोधात आवाज उठवला पाहिजे. चला 19 सप्टेंबरला याची सुरुवात करूया. हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा.
सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म
संयोजक
समृद्ध कोकण संघटना
कोकणातील सर्व आंबा बागायतदार संघटना
कोकणातील
शेतकरी संघटना
कोकणातील मच्छीमार संघटना
https://chat.whatsapp.com/FI3OxCEBqnJDcg21TOcLMb
Comments
Post a Comment