*विविध प्रकार व विविधरंगी राख्यांनी संगमेश्वर बाजारपेठ सजली*
भाऊ बहिणीच अतुट व पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी विविध प्रकारच्या राख्यांनी संगमेश्वर बाजारपेठ सजली आहे. संगमेश्वर बाजारपेठेत विविधरंगी राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, अवघ्या काही दिवसावर रक्षाबंधन येऊन ठेपला असल्याने बहीण भावाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण जपण्यासाठी आपल्या लाडक्या भावासाठी राखी घेण्यासाठी गर्दी केली आहे. अगदी 5 रुपयांपासून पुढे 200 रुपयांपर्यंत तसेच त्यापेक्षाही जास्त किंमतीच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. काही बहिणींना आपला भाऊ लांब राहत असल्याने राख्या पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवाव्या लागतात. त्यामुळे संगमेश्वर बाजारपेठेत काही दिवस आधीच राख्या विक्रीसाठी दुकानात दाखल झाल्या होत्या.
पूर्वी गोंड्याच्या राखीला ग्राहकांची अधिक पसंती असायची. मात्र, आता त्यात बदल होऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लहान मुलांसाठी रंगीबेरंगी कार्टून, डोरेमन, क्रिश, छोटा भीम या कार्टून असलेल्या तर मोठ्यांसाठी गोंडा, रुद्राक्ष, हिरेजडित आशा अनेक आकर्षित राख्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अशा विविधरंगी राख्या खरेदीसाठी बहिणींनी सुरुवात केली आहे.
Comments
Post a Comment