*संगमेश्वर शास्त्री पुलाजवळ संगमेश्वर पोलिसांनी केला गांजा जप्त*




*संगमेश्वर शास्त्री पुलाजवळ संगमेश्वर पोलिसांनी केला गांजा जप्त*

*कसबा काझी मोहल्ला येथील 23 वर्षीय तरुण अर्श साबीर काझी  याला पोलिसांनी केली अटक*


▪️कसबा काझी मोहल्ला येथील अर्श साबीर काझी हा संगमेश्वर जवळच्या शास्त्री पुलाच्या खालील बाजूस पुलाच्या खांबाच्या आडोशाला अमली पदार्थ करण्याचे साहित्य स्वतः जवळ बाळगून त्याद्वारे गांजा सदृश्य सेवन करीत असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे पोलीस सचिन कामेरकर, प्रमोद रामपुरे, मनवल, सोडमिसे,आव्हाड,कोलगे, आदी पोलिसांनी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शना खाली धाड  टाकली 

▪️यावेळी अर्श साबीर काझी  गांजा सदृश पदार्थ  सेवन करीत असल्याचे मिळून आला आहे. 11 हजार रुपयांचे  गांजा आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे 

▪️याबाबत प्रमोद गुलाब रामपुरे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल 

Comments