*परचूरी गावात बिबट्याचा धुमाकूळ तर वाशीत गवा रेड्याचे दर्शन, वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी*
▪️संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे बिबट्या वाघाने धुमाकूळ घातला असून रात्रीच्या दरम्यान येणाऱ्या वाघाने कुत्र्यांसह घरातील पाळीव कोंबड्यांना आपले लक्ष केले आहे .त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बिबट्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.
▪️परचुरी गावात रात्रीच्या दरम्याने बिबट्या वाघ येत असल्याने भीतीचे वातावरण आहे बिबट्या पाळीव कुत्र्यांबरोबर घरातील कोंबड्यांचा खुराड्यामध्ये ठेवण्यात येत असलेल्या कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे अनेक ठिकाणी चिखल्याच्या ठिकाणी बिबट्या वाघाचे पंजे उमटलेल्या दिसत आहेत तर वाशीमध्ये गवा रेड्याचे दर्शन होत असून शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत
Comments
Post a Comment