देवेंद्र फडणवीस घेणार जागावाटपांचा निर्णय; आशिष शेलार यांची माहिती*


देवेंद्र फडणवीस घेणार जागावाटपांचा निर्णय; आशिष शेलार यांची माहिती*


राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस जागावाटपाबाबत निर्णय घेतील, असा निर्णय कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. जागा वाटप आणि मतदारसंघांची निवड करण्याचा अधिकार फडणवीस यांना देण्यासाठी मुंबई येथे कोअर कमिटीची बैठक झाली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल बैठकीसाठी उपस्थित होते.  

मित्रपक्षांसोबत नियोजन आणि जागा वाटपाच्या व्यवस्थेव्यतिरिक्त जिंकण्याचे सूत्र निश्चित झाल्याच्या माहितीला शेलार यांनी दुजोरा दिला. याबाबत फडणवीस यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.

Comments