सुपरस्टारसोबत लिव्ह इन रिलेशनशिप

 

सुपरस्टारसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, मुलीच्या जन्मानंतर लग्न आणि १६ वर्षांनी घटस्फोट; अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था

अत्यंत वाईट दिवसया निर्णयानंतर सारिका यांनी वाईट दिवस पाहिले. अभिनेत्रीने सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये सांगितले होते की, जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा अभिनेत्रीच्या हातात फक्त ६० रुपये आणि एक कार होती. दैनंदिन गरजांसाठी मित्रमैत्रिणींकडून मदत घेतली. खाण्या-पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्थाही या दोस्तांनीच केली, तर रात्रीचा वेळ त्या कारमध्ये घालवायच्या. त्यांनी असे म्हटलेले की, 'मी ६० रुपये आणि माझी कार घेऊन निघाले. हे खूप अवघड होते, पण कसे तरी मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. आता अन्न कुठून येणार असा प्रश्न पडलेला. मी दोस्तांसोबत राहायचे, त्यांच्याच घरी आंघोळ करायचे आणि रात्री गाडीत झोपायचे'.


Comments