Ajit Pawar : गुलाबी जॅकेटनंतर आता पैठणीच्या जॅकेटची चर्चा, अजित पवार म्हणाले, “बायको म्हणेल उतारवयात…
Ajit Pawar Wear Paithani Jacket : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली. गेल्याकाही दिवसांपासून अजित पवारांच्या पिंक पॉलिटिक्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महिला मतदारांना आकर्षून घेण्याकरता अजित पवारांकडून सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर केला जातोय. चारचाकी वाहनांपासून ते कपड्यांपर्यंत अजित पवारांच्या आजूबाजूला गुलाबी रंग ठळकपणे दिसतोय. पण आज ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. आज ते येवल्यात बोलत होते.
अजित पवारांनी आज येवला येथे पैठणी विणकरांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात काम करतोय. मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो. पण तुमच्या लोकांनी पैठणीचं जॅकेटचं घातलंय. बायको म्हणले लग्नात नाही घातलं अन् आता उतारवयात घातलं कसं घातलं. पोराच्या लग्नाची वेळ आली अन् बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय.
Comments
Post a Comment