15 ऑगस्ट पासून बेमुदत जनआक्रोश आंदोलन,

हायवेसाठी 15 ऑगस्ट पासून बेमुदत जनआक्रोश आंदोलन,......
शेतकरी आणि मच्छीमारांसाठी 20 ऑगस्ट पासून बेमुदत स्वराज्यभूमी आंदोलन.....

75 वर्ष कोकणवाशीय शांत आहेत पण यापुढे शांत राहणार नाहीत !

    गेली सतरा वर्ष कोकण प्रदेशाचा एक हायवे बनतोय, निसर्ग समृद्ध कोकणामध्ये जायला एक धड रस्ता नाही, पर्यटन हा कोकणचा मुख्य व्यवसाय या कोकण राष्ट्रीय महामार्गामुळे कोकण वीस वर्षे मागे गेले. केवळ प्रवास नाही पण कोकणच्या आर्थिक विकासाचे प्रचंड नुकसान झाले.
 
      आमच्या पर्यटन व्यवसायिकांना आंबा बागायतदारांना शेतकऱ्यांना कुठल्याही योजना नाहीत सबसिडी नाही प्रोत्साहन नाही जे कोकणच्या विकासाचे मूळ विषय आहेत त्यांच्यासाठी बजेट नाही. सरकार कोकणातील व्यवसायिकांना उद्योजकांना तरुणांना शेतकऱ्यांना अंबा बागायतदारांना मदत करत नाही इथपर्यंत ठीक आहे. 

     पण या देवभूमी मध्ये ज्या भूमीने देशाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य दिले त्या भूमीमध्ये जाण्यासाठी एक साधा रस्ता दिला जात नाही. दरवर्षी सांगितले जाते पुढच्या वर्षी पूर्ण होईल, गणपतीला दरवर्षी कोल्हापूर मार्गे जा तुम्हाला टोल माफ करू हे जखमेवर मीठ  चोळणे आहे. 

      सुदैवाने रस्ता बऱ्यापैकी पूर्ण होत आहे त्यामुळे यावर्षी कोणीही कोल्हापूर मार्गे जाऊ नका कोकण मार्गे जा. पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात रस्त्याची वाट लागलेली आहे. गणपती पर्यंत ती सुधारेल ही अपेक्षा आहे. 

     पण आता कोकण वाशीयांची सहनशक्ती संपली आमची सहनशक्ती संपली त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा/ सोल्युशन निघाले पाहिजे. रस्ता युद्धपातळीवर पुढील सहा महिन्यात पूर्ण झाला पाहिजे. ज्या चुका हा रस्ता बनवताना केल्या, धरण बांधल्यासारखा रस्ता बांधला, परशुराम चा मातीचा डोंगर  खणला, दहा वर्ष चिपळूणचा ब्रिज बनतोय, लांजा हातखंबा संगमेश्वर रस्त्याची अवस्था भयानक आहे, माणगाव इंदापूर चा बायपास आजही बनलेला नाही, देशभर वेगाने हायवे बांधणाऱ्या यंत्रणेकडून ही कामे पुढील वर्ष सहा महिन्यात पूर्ण व्हावीत अशी आमची सर्वांची आणि कोकणवासी यांची इच्छा आहे. 

      रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही, हायवेची इतकी भयानक स्थिती असताना सुद्धा आम्ही कोकणवासीय शांत, पण आता नाही आणि म्हणूनच जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी 
पुढाकार घेऊन हायवेच्या आंदोलन सुरू केले आहे.

 कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात कोकणात पहिल्यांदाच भव्य स्वरूपात माणगाव येथे बेमुदत आंदोलन हायवेसाठी सुरू होत आहे.

 हायवेच्या मागण्यांसाठी धरणे आणि उपोषण हे सुद्धा 15 ऑगस्ट पासून बेमुदत .....सरकारने  आपल्या मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन.............   . हा निर्णय जो जन आक्रोश समितीने घेतला आहे या निर्णयाला समृद्ध कोकण संघटना आणि आपण जे शेतकऱ्यांसाठी स्वराज्य भूमी आंदोलन सुरू करत आहोत या आंदोलनाच्या वतीने आम्ही 
माणगाव येथे आयोजित केलेल्या हायवे आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. 

      15 ऑगस्ट सकाळी नऊ वाजल्यापासून माणगाव एसटी स्टँड समोर हे आंदोलन सुरू होईल आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालू राहील. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी 15 ऑगस्ट ला या आंदोलनामध्ये उपस्थित राहावे आणि त्यानंतर सोयीप्रमाणे पुढच्या आठ दिवसात कधीही एक दिवस या आंदोलनासाठी द्यावा. प्रत्येक संवेदनशील कोकणातील नागरिक आणि कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होईल ही अपेक्षा आहे. 
 फेसबुक आणि व्हाट्सअप वर कोकण विकासाची नुसती चर्चा आणि चिंता उपयोगाची नाही त्यापेक्षा कोकणावर होणाऱ्या अन्याय विरोधात एक दिवस रस्त्यावर उतरले पाहिजे ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील गुगल फॉर्म भरावा. 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSefhsuyuW6jzHnN0lyvFZkhG8pjrV88P-D8zc4uM02nPCmL3g/viewform

     याच पद्धतीने कोकणातील तरुणांना कोकणातील 90% नोकऱ्या मिळाव्यात व्यवसाय उद्योग करण्यासाठी सरकारकडून मदत मिळावी सहजपणे परवानगी मिळाव्यात शेतकऱ्यांवर आणि मच्छीमारांना गेल्या 75 वर्षात मागितली नाही पण एकदा कर्जमाफी मिळावी, काजू बिला आणि सुपारीला हमीभाव मिळावा, सतत होणाऱ्या अन्याय विरोधात भव्य प्रमाणात स्वराज्य भूमी आंदोलन शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या  मागण्यांसाठी आंदोलन 20 ऑगस्ट पासून बेमुदत सुरू होत आहे. 

      कोकण भूमी देवभूमी निसर्ग भूमी या समृद्ध भूमीला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांच्या आंदोलन भु खिणगिनी या ऐतिहासिक गावातून सुरू होत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुद्धा नोंदणी करावी.

*संजय यादवराव*
समृद्ध कोकण संघटना

प्रविण किणे
अभियान मावळा

Comments