Breaking : अनिल परब यांच्यासह दोघांवर दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

दापोली : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अनिल परब यांच्यासोबत मुरुड चे तत्कालीन सरपंच सुरेश शंकर तुपे आणी तत्कालीन ग्रामसेवक अनंत कोळी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटे या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं असलं तरी हे रिसॉर्ट परब यांचंच असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर मनी लोडिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर परब यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. इतकंच नाही तर, परबांची तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, आता अनिल परब यांच्यासह इतरांविरोधात रत्नागिरीच्या दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे परब यांचं रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देण्यात आली होती. तसेच तीन महिन्यात हे रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परब यांचं हे रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Comments
Post a Comment