निवळी घाटात एसटी बस-खासगी आरामबसचा अपघात

 

 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निवळी घाट येथील बावनदी नजीक एका वळणावर एसटी बस आणि खासगी आरामबस यांच्यात समोरासमोर धडक होउन अपघात झाला. यात एसटी चालक, वाहक आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी खासगी बस चालक कालीदास हरिश्चंद्र कवठणकर (६३, मुळ. रा. उत्तर गोवा ) विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात एसटी बस चालक साठवाराव गणेशराव येळणे (४०, मुळ रा. हिंगोली सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानूसार, बुधवारी पहाटे ते त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच - २० बीएल- ४०२८) मधून वाहक भूषण खांडेकर (३७, मुळ रा. बत्तीस शिराळा सांगली) यांना घेउन प्रवाशांसह चिपळूण - रत्नागिरी असे येत होते. सकाळी ६ वाजता सुमारास ते बावनदी येथील वळणावर आले असता गोवा ते मुंबई जाणाऱ्या खासगी बस टेंम्पररी नंबर (जीए- ०२ एमआर ३१८ ) वरील चालकाने पुढील ट्रकला आव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या विरुध्द दिशेला येत एसटी बसला समोरुन धडक देत अपघात केला.

Comments