टीआरपी येथे दुचाकीवरुन पडलेल्या जखमी महिलेचा मृत्यू

 Premium Photo | Dead body laying on a floorfocus at the hand

रत्नागिरी : शहरातील टीआरपी येथे घरी जाताना दुचाकीवरुन पडलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान गुरुवारी (ता. १०) सकाळी त्यांचा मृत्यू झाला...

आरती गणेश जाधव (वय ५९, रा. टिआरपी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सिद्धेश विठ्ठल मटकर (वय २४, रा. पेंडखळे, ता. राजापूर सध्या शिवाजीनगर रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच ०८ एफ ८३८१) सोबत मयत आरती जाधव यांना दुचाकीच्या मागे बसवून घेऊन टिआरपी येथे त्यांच्या घरी जात असताना आरती जाधव या दुचाकीवरुन खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी (ता.१०) सकाळी नऊच्या सुमारास उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

Comments