पालकमंत्री उदय सामंत यांचा आज जनता
![]()
रत्नागिरी : आज ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत जनता दरबार भरणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अल्पबचत सभागृहात ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जनता दरबाराचे कामकाज सुरू होईल.
या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित राहणार असून नागरिकांना आधी टोकन क्रमांक दिले जाणार आहेत. जनता दरबारात मिळालेल्या अर्जांची नोंद घेऊन त्यावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे जनता दरबार आयोजित केला जाणार आहे.
Comments
Post a Comment