देवरूख येथील खूनप्रकरणी पोलिसांचा सांघिक तपास

देवरूख : शारदा दत्तात्रय संसारे या वृध्द महिलेचा निघृण खून झाल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही देवरूखमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक लॅब व देवरूख पोलिस यांचा संयुक्तिक तपास सुरूच आहे. खून नेमका दागिन्यांसाठी झाला आहे की अन्य कारणाने? याचा तपास सुरू आहे.
बुधवारी काही महिलांची जबानी घेण्याचे काम सुरू होते. याबाबत पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्याकडे चौकशी केली असता तपास सुरू असून कोणतेच खुनाचे धागेदोरे हाती लागले नसल्याचे स्पष्ट केले. दोन दिवस सर्व विभाग या खुनाच्याच तपासात असल्याने खुनांचे पुरावे शोधण्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच सत्य बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
Comments
Post a Comment