आशा सेविकांच्या मागण्यांचे शासनाला निवेदन

 

रत्नागिरी : आशा स्वयंसेविकांना ए. बी. एच. ए. आरोग्य पत्रक काढण्याची जादा काम देऊ नये. अशी मागणी आशा प्रवर्तक व गटप्रवर्तक संघटनेने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आशांना या पूर्वी ७८ कामे नेमून देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर गटप्रवर्तक महिलांनासुद्धा कामे नेमून देण्यात आलेली आहेत. अनेकवेळा या कामाशिवाय अनेक आरोग्य अधिकारी स्वतःला मनमानी येईल ते काम आशांना करावयास सांगत आहेत. त्या कामाचा कसलाही मोबदला दिला जात नाही. माझे कुटुंब माझी रत्नागिरी या उपक्रमांतर्गत काम करून घेण्यात आले. त्याचाही मोबदला अद्याप दिलेला नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.

सच्या ए. बी. एच. ए. कार्ड काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी १० रुपये देण्यात येणार आहेत. असे असते तरी हा मोबदला अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे कामच देव नये जर दिलं तर किमान वेतनानुसार मोबदला द्यावा अशी मागणी आशा स्वयंसेविकांना निवेदनात करण्यात आली आहे.

Comments