कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना आजपासून जादा डबा

 

KONKAN RAILWAY TIME TABLE - Amazing Maharashtra

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गी धावणाऱ्या दोन एक्स्प्रेस गाड्यांना दि. ७ नोव्हेंबरपासून स्लिपर श्रेणीचा प्रत्येकी १ अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

गांधीधाम -तिरुनेलवेली तसेच भावनगर - कोचुवेली या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. दिवाळीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून गाड्यांना गर्दी होऊ लागल्याने नियमित गाड्यांना जादा डबे जोडले जात आहेत. यानुसार गांधीधाम तिरुनेलवेली या गाडीला दि. ७ नोव्हेंबर रोजी तर भावनगर -कोचुवेली या गाडीला दि. ८ नोव्हेंबरच्या फेरीसाठी स्लिपर श्रेणीचा अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.

Comments