रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी जयश्री गायकवाड यांची नियुक्ती

 

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. तर कोल्हापूर (गडहिंग्लज) येथील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची नियुक्ती रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे. लवकरच त्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई या परिविक्षाधीन कालावधीत रत्नागिरीत होत्या. त्यानंतर बढतीने अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बजावली होती. गेले दोन वर्ष रत्नागिरीत कार्यरत होत्या. जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका

नूतन पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड या यापूर्वी रत्नागिरी शहर उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. यावेळी त्यांनी अनेक गुन्हे उघड केले होते. त्यानंतर लांजा डीवायएसपी म्हणून त्यांनी काम केले होते. विभागातील पोलीस स्थानकात अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांची त्यांना परिपूर्ण माहिती होती. त्यांचीच नियुक्ती रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी झाल्याने त्याचा फायदा जिल्ह्यातील गुन्हे उकल करताना होणार आहे.

Comments