गणपतीपुळे येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्साहात; हजारो दिव्यांनी उजळले श्रींचे मंदिर

 

रत्नागिरी : कार्तिक पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील श्रीदेव गणपतीपुळे मंदीरात सोमवारी सायंकाळी दीपोत्सवाची त्रिपुरारी पोर्णिमेला सांगता झाली.

 

यावेळी संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून गेला होता. मंदीर परिसरात संस्थेचे पदाधिकारी व आलेला भक्तगणांनी पणत्या लावून त्रिपुरारी पोर्णिमा साजरी केली.

Comments