वेरळ येथे तरुणाचा गळफास

खेड : तालुक्यातील वेरळ प्रभुवाडी येथे एका तरुणाचा मृतदेह त्याच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
ही घटना दि. ९ रोजी सकाळी ७.३० वाजता निदर्शनास आली. महेश भिवा मळेकर (वय ३२, रा. वेरळ प्रभुवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती भूषण अनंत जड्याळ (वय २३, रा. वेरळ प्रभुवाडी) यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment