देवरुखात दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून; पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

देवरुख : देवरुख क्रांतीनगर विभागातील अपार्टमेंट मध्ये टेरेसवरील पाण्याच्या टाकीत सोमवारी रात्री महिलेचा मृतदेह आढळून आला. अंगावरील दागिन्यांच्या चोरीसाठी हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला.
शारदा दत्तात्रय संसारे ( वय वर्ष८०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शारदा आणि त्यांचा मुलगा दिपक दत्तात्रय संसारे या अपार्टमेंट मध्ये रहात होते. सोमवारी सकाळी ९.३० वाजता फिर्यादी दिपक संसारे हे कामासाठी घराबाहेर पडले होते. दुपारी दिपक संसारे हे घरी परतले तर ब्लॉकला कुलुप होते. दिपक यांनी आईचा शोध घेतला, शारदा यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होत नव्हता. यामुळे दिपक संसारे यांनी सहकाऱ्याच्या मदतीने कुलुप घरात नव्हत्या. संध्याकाळपर्यंत दिपक यांनी आईचा शोध घेतला. तोडले शारदा
रात्री घरी बाथरुममध्ये हातपाय धुवायला गेल्यावर लालरंगाचे मिश्रित पाणी नळातून आल्यावर दिपक यांच्या मनात अघटित घडल्याची शंकेची पाल चुकचुकली. दिपक संसारे यांनी सहकाऱ्याच्या मदतीने लगेचच टेरेसवर धाव घेतली. पाण्याच्या टाकीमध्ये दिपक यांना शारदा यांची साडी दिसुन आली. यावेळी आईच्या कपाळावर जखम दिसुन होती व अंगावरील दागिने चोरुन नेल्याचे दिसुन आले. यामध्ये हातातील पाटल्या, गळ्यातली माळ व कानातील कुडी गायब झाल्याचे निदर्शनास आले.
हि बाब दिपक संसारे यांनी देवरुख पोलीसांना कळवली. देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सहकान्यांसह घटनास्थळी धाव घेतली व तपासाची सुत्रे वेगाने हलवली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. घटनेचे गांभिर्य ओळखुन तपास तीन टप्प्यात सुरु झाला. रत्नागिरी पोलीस उपविभागिय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
मंगळवारी सकाळी घटनास्थळी ठसे तज्ञ, श्वानपथक व फोरेन्सिक लॅब तज्ञ दाखल झाले व तपास सुरु केला. श्वान बिल्डिंग परिसरातच घुटमळला. अज्ञाताविरुद्ध भा.द.वी.क. ३०२, २०१, ३९४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागही तपास करत आहे. रत्नागिरी शहरात खुन, आत्महत्या, चोरी याची सलग मालिका सुरू असताना देवरुख मध्ये घडलेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment