स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे सहकार सप्ताह ठेव योजना

 

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सहकार सप्ताहानिमित्ताने ठेव योजना जाहीर केली आहे.

सोमवारी सुरू झालेली ही योजना २० नोव्हेंबरपर्यंत चालू राहील. या ठेव योजनेसाठी १२ ते १८ महिने मुदतीच्या ठेवींवर ६.७५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ७ टक्के व्याजदर संस्थेने घोषित केला आहे. तसेच १९ ते ६० महिने मुदतीच्या ठेवींवर ७ टक्के, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ७.२५ टक्के व्याजदर घोषित करण्यात आला आहे.

संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभी असून जमा होणाऱ्या रकमेचे काटेकोर नियोजन करीत असते. सद्यःस्थितीत संस्थेच्या एकूण ठेवी २५९ कोटी ७७ लाख एवढ्या असून एकूण कर्ज १७२ कोटी ६७ लाख एवढे आहे. या सहकार सप्ताह ठेव योजनेमध्ये अधिकाधिक ठेवीदारांनी ठेव ठेवून या आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

 

Comments