चिपळूण: मुत्तप्पन मंदिरात आज पुत्तेरीवल्लाट्टम् सण
चिपळूण : शहरातील राधाकृष्ण नगर येथे चौदा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मुत्तप्पन मंदिरात सोमवारी (दि. १४) पुत्तेरीवल्लाट्टम् सण साजरा करण्यात येणार आहे.
बहादूरशेख परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये चौदा वर्षांपूर्वी मुत्तप्पन स्वामींचे आकर्षक मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर दरवर्षी मंदिर वर्धापन दिनासह नोव्हेंबर महिन्यात पुत्तेरीवल्लाट्टम सण साजरा करण्यात येतो. त्यानुसार यंदादेखील सोमवारी दिवसभर मंदिरामध्ये धार्मिक विधींसह सायंकाळी उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी धार्मिक विधी व पूजा, सायंकाळी ४ वा, मला अरक्कल, ५ ते ७ वा. दर्शन, ७ ते ९ या वेळेत महाप्रसाद असे कार्यक्रम होणार असून शहर परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुत्तप्पन सेवा समितीद्वारे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment