बाळाचे प्राण वाहक-चालकांचा रत्नागिरी आगारात सत्कार

 

रत्नागिरी : बस प्रवासादरम्यान अवघ्या वर्षाच्या मुलाला जास्त भरल्याने परिस्थितीचे भान राखत चालक वाहनाने बस आगारातून थेट रुग्णालयात नेऊन उपचार केल्याने या बाळाचे प्राण वाचले आहेत. चालक वाहनाच्या संवेदनशील वाहक व चालकाच्या भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

रत्नागिरी आगाराची बस अंबाजोगाई मार्गे बीडला जात असताना नेकनूर ते बीड प्रवास करताना एका महिलेच्या १ वर्षांच्या लहान मुलाला ताप जास्त असल्याने हृदय विकाराचा झटका आला होता. यावेळी रत्नागिरी आगरातील वाहक महादेव फड यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी चालकाला कुठेच न थांबता थेट हॉस्पिटलमध्ये घेण्यास सांगितले. त्यामुळे बाळाला तातडीने उपचार मिळून जीवावरील संकट टळले आहे. आगार व्यवस्थापक पाटील, शिंदे, स्थानकप्रमुख प्रभुणे यांनी दोघांचे कौतुक केले.

Comments