पुनस येथे त्रिपुरारी पौर्णिमोत्सव उत्साहात

 ताजा अत्यंत जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील पुनस येथील स्वयंभू श्री साब देवस्थानचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा (टिपूर) यात्रोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

तालुक्यातील पुनस येथील स्वयंभू श्री सांब देवस्थान हे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. या देवस्थानचा वार्षिक त्रिपुरारी (टिपूर) यात्रोत्सव सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यानिमित्ताने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, दीप प्रज्वलन (टिपूर पाजळने), पालखी प्रदक्षिणा तसेच लांजा येथील संस्कृती फाऊंडेशन लांजा या संस्थेच्या मुलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले. हा वार्षिक यात्रोत्सव संपूर्ण लांजा तालुक्यात प्रसिद्ध आहे. लांजा तालुक्यासह रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई, टिके, टेभ्ये, हातीस, चांदोर, निरुळ, तोणदे, कुरतडे या ठिकाणाहून भाविक आले होते.

Comments