दापोलीत रंगावली प्रदर्शन

दापोली : दापोलीतील नामदेव मंदिरात येथे फ्रेंडशिप संस्थेच्या वतीने निमंत्रितांचे ३४ वे रंगावली प्रदर्शन गुरुवारी सुरू झाले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालंगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश कोटिया, सीए संदीप खोचरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन १६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे.
Comments
Post a Comment