राज्य खो-खो स्पर्धा: रत्नागिरीच्या महिला संघाला तिसरे स्थान

 

रत्नागिरी : हिंगोली येथे झालेल्या 58 वी राज्यस्तरीय पुरुष-महिला अर्जिक्यपद खो-खो स्पर्धेत रत्नागिरीच्या महिला संघाने तिसरा तर पुरुष संघाने 11 वा क्रमांक पटकावला. अनुभवींसह नव्या खेळाडूंकडून चांगल्या खेळ केला.

हिंगोली येथील रामलीला मैदानाव या स्पर्धा पार पडल्या. मागील काही वर्षे रत्नागिरीच्या महिला संघाने राज्य निवड चाचणी स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. हिंगोली येथील स्पर्धेत महिलांनी साखळी सामन्यापासूनच वर्चस्व राखले होते. गटातील सामन्यात महिलांनी जळगावला 1 ठाव 16 गुणांनी ( 18-2), तर पालघरला 1 डाव 10 गुणांनी (16-6) पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात रायगडला सहज नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात रत्नागिरीची गाठ बलाढया सांगली संघाशी होती. प्रशिक्षक पंकज चड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महितांच्या संपांनी सांगलीचे आक्रमणही परतवून लावले. प्रशिक्षक चवंडे यांनी रत्नागिरीच्या अनुभवी खेळाडूंना पहिल्या डावामध्ये संरक्षणासाठी उतरवले होते.

प्रशिक्षकांचा विश्वास सार्थकी ठरवत अपेक्ष सुतार, आरती कांबळे आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू ऐश्वर्या सावंत यांनी पहिल्या डावा रत्नागिरीता आपाठी मिळवून दिली. मध्यंतराला तिन गुणांची आघाडी रजागिरीकडे होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील खेळाडू श्रेया सनगरे, पायत पवार, दिव्या पालये, साधी डाफळे यांनीही जोरदार खेळ करत विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. सांगलीचा पराभव करून रत्नागिरीने दिमाखात उपांत्य फेरीत मिळवला. उपांत्य फेरीमध्ये बलाढ्य पुणे संघाकडून स्वागिरीचा पराभव झाला. यामध्येही स्वागिरीच्या खेळाडूंनी चांगली लढत दिली; परंतु पुण्याच्या तगड्या खेळाडूंपुढे निभाव लागला नाही. रत्नागिरीच्या महिला संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले..

दरम्यान या स्पर्धेत पुरुष संघानेही चांगली कामगिरी केली. गटातील सामन्यात जालना संघावर सहज मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; मात्र या सामन्यात बलाढ्य सांगतीबरोबर पराभव पत्कारावा लागला. रैंकिंगच्या लघुत्तम आक्रमणातील सामन्यात पुरुष संघाने 11 वा पटकावला. गतवर्षी पुरुषांचा संघा 16 व्या क्रमांकावर होता. पुरुष संघाचा प्रशिक्षक म्हणून आकाश सोळंकी यांनी भुमिका बजावली.

दोन्ही संघांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ साळवी, राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदिप तावडे, प्रशांत देवळेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, प्रसाद सावंत, राजेंद्र चव्हाण, राजेश चव्हाण, राजेश कळंबटे, भाऊ पालये, सचिन लिंगायत, प्रशांत कवळे, प्रसाद पाटील, सुरज आयरे, राघवेंद्र पोकळे, सदानंद आग्रे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, माजी पंचायत समिती सदस्या सौ. साक्षी रावणंग, संतोष रावणंग यांनी अभिनंदन केले आहे.

Comments