बाईकची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक, भीषण अपघातात जागेवर तिघांचा मृत्यू अन् सगळंच संपलं

 major road accident on patas daund raod

Pune News : दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावर भीषण अपघाता झाला. रात्री झालेल्या या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुचाकी आणि उसाच्या ट्रॉलीच्या धडकेत या तिघांचाही मृत्यू झाला आहे.

 
पुणे : भीषण अपघाताची अजून एक बातमी समोर आली आहे. हा अपघात दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावर झाला आहे. रात्री झालेल्या या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुचाकी आणि उसाच्या ट्रॉलीच्या धडकेत या तिघांचाही मृत्यू झाला आहे.

रात्रीच्या वेळी उसाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते. मात्र, तरही ट्रॅक्टर चालक आणि मालक याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. याच कारणामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा ट्रॅक्टरचा अंदाज येत आहे.
 
उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, तरीही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही. याचा कारणामुळे ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. अशाच एका अपघातात आता या तीन तरुणांना आपला जीव गमावाव लागला आहे.

Comments