प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या दौऱ्यानिमित्ताने रत्नागिरीत भाजपतर्फे दुचाकी फेरीचे आयोजन

रत्नागिरी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे २५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत येणार असून त्यानिमित्ताने रत्नागिरीत भव्य दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.
श्री. बावनकुळे यांचे भव्य स्वागताची तयारी भाजपाने केली आहे. त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने भाजपाकडून ५०० दुचाकीस्वारांची फेरी काढण्यात येणार असून, या फेरीचे नियोजन राजू तोडणकर, शहर अध्यक्ष सचिन करमरकर, विक्रम जैन, संदीप सुर्वे, नितीन जाधव, संदीप रसाळ यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. छत्रपती शिवाजी क्रीडांगणापासून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयापर्यंत ही फेरी निघणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात होणाऱ्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, बीथ प्रमुख, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
Comments
Post a Comment