पोफळीत आज लोकनृत्य स्पर्धा
शिरगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण यांच्यावतीने पोफळी करमणूक केंद्र येथे गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धा ११ नोव्हेंबर रोजी १२ ते ६ या वेळेत होणार आहेत.
बक्षीस वितरण प्रसंगी महानिर्मिती मुख्य अभियंता संजय चोपडे, अधीक्षक अभियंता राजेश कुंभार, अजय शिंदे, एक्सेल इंडस्ट्रीजचे एचआर मैनेजर आनंदा पाटणकर, कृष्णा अँटीऑक्सिडंट कंपनीचे सुयोग चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
कामगार व कुटुंबीय समावेश असलेल्या स्पर्धेतील कलावंतांना प्रोत्साहीत करण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment