चिपळूण पेठमाप येथील महिलेच्या खूनप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

चिपळूण : शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला येथील कुलसूम अन्सारी या महिलेच्या खून प्रकरणी संशयिताची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पेठमाप मुकादम मोहल्ला येथे कुलसूम अन्सारी या महिलेचा मृतदेह सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी आढळून आला. अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खुनाचा संशय होता. या नुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पाच दिवसांत पोलिसांनी संशयित आदवडे नामक तरुणाला अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Comments
Post a Comment