राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीला दोन पदके

रत्नागिरी : मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शुटींग चैम्पियनशिप २०२२ स्पर्धेत रत्नागिरीच्या पदरी दोन पदके पडली आहेत.
येथील रत्नदुर्ग पिस्टल अॅण्ड रायफल शुटींग या असोसिएशनमार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बाजी मारलेल्या स्पर्धकांची भोपाळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
३७ वी महाराष्ट्र राज्य शुटींग चॅम्पियनशिप २०२२ ही स्पर्धा मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत २५ मीटर स्टॅण्डर्ड पिस्टल ज्यु. (पुरुष) या प्रकारात रत्नदुर्ग पिस्टल अॅण्ड रायफल शुटींग असो.च्या स्वयम विक्रांत देसाई याने रौप्य पदक पटकावले. तर ५० मीटर प्रोन रायफल प्रकारात पुष्कराज इंगोले यांनीही रौप्य पदक पटकावले. त्यांना दुसरी रँक मिळाली आहे. स्पर्धेत निर्झरा शिवाजी पाटील हिने चौथी रैंक मिळवली. या स्पर्धेत साताराच्या राजवर्धन पाटील याने सुवर्णपदक तर नाशिकच्या साहिल दुधाने याने कांस्य पदकाची कमाई केली.
स्पर्धेतील विजेत्यांना रविवार दि.६ रोजी यवतमाळचे विधान परिषद सदस्य दुश्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रायफल असो.च्या सचिव शिला कानुंगो उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment