पुणे, मुंबई, ठाणे, उस्मानाबादसह रत्नागिरीची उपउपांत्य फेरीकडे वाटचाल

 

हिंगोली : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा व तालुका खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथील रामलीला मैदानावर ५८ वी राज्यस्तरीय पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतील दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात साखळी सामन्यात महिला गटात रत्नागिरीच्या संघाने पालघरचा पराभव केला.

तर अन्य सामन्यात पुणे, मुंबई, ठाणे, उपनगर, उस्मानाबाद या संघांनी विजय मिळवत उपउपांत्य फेरी गाठली. पहिल्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात महिला गटातील सांगली विरुद्ध नाशिक हा सामना वगळता अन्य बहूतांश सामने एकतर्फी झाले. महिला गटामध्ये रत्नागिरीने पालघरचा १ डाव १० गुणांनी (१६-६) विजय मिळवला. अपेक्षा सुतार (४ खेळाडू), पायल पवार (४), साक्षी डाफळे (३) यांच्या धारदार आक्रमणाच्या जोरावर रत्नागिरीने नऊ मिनिटात १६ गडी बाद केले.

पहिल्या संरक्षणावेळी श्रेया सनगरे (३ मि.), आरती कांबळे (३ मि.), ऐश्वर्या सावंत (नाबाद ३ मि.) तर दुसऱ्या संरक्षणात पायलने (२.४० मि), पल्लवी सनगलेने (२ मि.), आर्या डोर्लेकरने (२.१०) आणि मृण्मयी नागवेकरने (१.२०) खेळ केला. मुंबईने लातूरचा एक डाव 5 गुणांनी पराभव केला. मुंबईतर्फे संजना कुडव (३.१० मि. व ४ खेळाडू), श्रेया नाईक (३.३० मि.), मयुरी लोटणकर (२.२० मि.), रिध्दी कबीर (२.३० मि. व ३ खेळाडू) असा खेळ केला. तर लातूरतर्फे वैभवी शिंदे (१.२० मि) चमकली. दुसऱ्या सामन्यात ठाणेने धुळेचा १ डाव ८ गुणांनी (१५-७) असा पराभव केला. विजयी संघातर्फे साधना गायकवाड (२.५० मि), शितल भोर (२.४० व १ खेळाडू), कल्याणी कनक (५ खेळाडू), कविता चाणेकर (४ खेळाडू) चांगला खेळ केला. तर धुळेतर्फे मानसी पाटील (१ मि १.२० मि ) व्यतिरिक्त अन्य कोणालाही खेळ करता आला नाही. अन्य सामन्यात महिला गटात रत्नागिरीने पालघरचा १ डाव १० गुणांनी (१६-६), मुंबई उपनगरने औरंगाबादचा १ डाव ४ गुणांनी (११-७), मुंबईने साताऱ्याचा १ गुण आणि ८ मिनिटे राखून (११-१०), सोलापूरने अहमदनगरचा १ डाव ५ गुणांनी (१२-७), पुणेने रायगडचा १ डाव १२ (१८-६) औरंगाबादने सिंधुदुर्गचा ४ गुणांनी (११-७) असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली.

पुरुष गटात मुंबई उपनगरने रत्नागिरीचा एक डाव ११ गुणांनी पराभव केला. उपनगरतर्फे ओमकार सोनावणे (२३० मि.), ऋषिकेश मुर्चावडे (२.३० व १ गडी), अनिकेत पोटे (१.४० व ३ गुण) असा तर रत्नागिरीतर्फे निखिल सनगले (१ मि.) केला औरंगावादतर्फे अस्मित गावीत (२ मि.)

पुरुष गटात मुंबई उपनगरने रत्नागिरीचा एक डाव ११ गुणांनी पराभव केला. उपनगरतर्फे ओमकार सोनावणे (२.३० मि.), ऋषिकेश मुर्चावडे (२.३० व १ गडी), अनिकेत पोटे (१.४० व ३ गुण) असा तर रत्नागिरीतर्फे निखिल सनगले (१ मि.) चांगला खेळ केला. औरंगाबाद संघाने जळगावचा १ डाव २ गुणांनी पराभव केला. औरंगाबादतर्फे अस्मित गावीत (२ मि.), आकाशा खोजे (२.१० मि. व २ गडी) यांनी तर जळगावतर्फे स्वप्नील चौधरी (२.१० मि) चमकदार कामगिरी केली. अन्य सामन्यात नंदुरबारने लातूरचा १ डाव १ गुण (१०-९), ठाणेने सिंधुदुर्गचा १ डाव १२ गुणांनी (२१-९), अहमदनगरने नंदुरबारचा १ डाव २ गुणांनी (११-९), पालघरने नांदेडचा १० गुणांनी (१९-९), सांगलीने साताऱ्याचा १ डाव ५ गुणांनी (१६-११) यांनी उपउपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली. दरम्यान, शनिवारी (ता. ५) सायंकाळी उशिरा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी खो-खो अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, सचिव अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह अन्य हिंगोली जिल्ह्यातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

Comments