भोस्ते घाटात गॅसवाहू टँकर पलटी

  

रायबरेली में तेज रफ्तार ट्रक ने बाइक में मारी टक्‍कर, दो शिक्षामित्रों ने तोड़ा दम - lucknow speeding truck hits bike in Rae Bareli

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवार १ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाला. अपघातानंतर टैंकर पलटी झाला. त्यानंतर गॅस गळतीला सुरुवात झाली.

अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी घाट दोन्ही बाजूंनी बंद केला आहे. घाट बंद झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. घाट बंद झाल्यामुळे घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या वेरळ- कोंडीवली-शिव मार्गे बोरज इथून छोट्या वाहनांना मार्ग देण्यात आला. तर मोठी वाहने मात्र महामार्गावरती रखडून होती. घाट सुरू होण्यास किती वेळ लागेल याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान टँकरची गळती काढण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक पथकाला बोलावलं होत. घाटात गॅसची दुर्गंधी पसरली होती. गॅसचा टँकर पलटी होऊन गॅस गळती झाल्यानंतर सर्वात आधी खेड नगरपालिकेचा अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेतली. मात्र, गॅसला गळती लागली असल्यामुळे त्यांनी संबंधित विभागाला पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत अधिकची माहिती मिळू शकली नाही.

Comments