चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

 चिपळूण : चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. ११ रोजी सकाळी १०:३० वा. शहरातील सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत मागील इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२१-२२ या वर्षाच्या जमा-खर्चाला मंजुरी, सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकास मंजुरी, सन २०२१-२२ या वर्षाचे लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे, उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करणे, कार्यकारी मंडळ सदस्य व पदाधिकारी नियुक्तीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर करणे, अध्यक्ष मनोगत, एकात्मतेची शपथ आदी विषय ठेवण्यात आले आहेत. या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष काशिराम कदम, सरचिटणीस भार्गव घाडगे यांनी केले आहे.

Comments