श्री क्षेत्र परशुरामाच्या डोंगरमाथ्यावरील भव्य पणती एकविसाव्या वर्षीही प्रज्वलित
चिपळूण: श्री क्षेत्र परशुराम येथील डोंगरमाथ्यावरील श्री क्षेत्र परशुरामाच्या डोंगरमाथ्यावरील भव्य पणती एकविसाव्या वर्षीही प्रज्वलित करण्यात आली त्रिपुरारी पौर्णिमेच्या महर्तावर भाविकांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा दीपोत्सव साजरा.
चिपळूणजवळच्या परशुराम क्षेत्रात सवतसड्याच्या वरील टेकडीवर पुरातन भव्य पणती आहे. तेथील भव्य दीपमाळ शिवकालीन असून त्याच्या वरच्या बाजूला ही पणती कोरलेली आहे. तेथे त्रिपुरारी पोर्णिमेला पणती प्रज्वलित केली जात असे. काही कारणांनी बंद पडलेली ही प्रथा वीस वर्षांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. परशुरामभक्त नितीन लोकरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामदेवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी परशुराम येथील ही पणती प्रज्वलित करण्यासाठी १ डबा तेल आणि वातीसाठी १ धोतर प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परंपरा होती. ती परंपराही पुन्हा सुरू करण्यात आली आणि जुना काळभैरव देवस्थान ट्रस्टमार्फतच तेल आणि धोतर दिले जाते.
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्री परशुराम मंदिरातून मशाल प्रज्वलित करून घेऊन पुढे दौड करत टेकडीवरील भव्य पणती प्रज्वलित करण्यात आली. तेथे जाण्यासाठी परशुराम गावातील पायरवाडीतून पाऊलवाट आहे. त्याच वाटेने ही दौड झाली. पणती प्रज्वलित करण्याच्या कार्यक्रमाला श्री. लोकरे यांच्यासह चिपळूण शहरातील तसेच परिसरातील कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
Comments
Post a Comment