भोस्ते येथे रेल्वे बोगद्यात आढळला तरुणाचा मृतदेह
खेड : कोकण रेल्वेच्या मार्गावरील खेड ते आजणी रेल्वे स्टेशन दरम्यान भोस्ते गावानजीक बोगद्यात २८ वर्षीय तरुण मोहम्मद शरीफ अन्सारी (वय २८ रा. मुन्नाफ्फर राज्य बिहार) याचा कोणत्यातरी अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने मृत्यू झाला आहे. दि. ११ रोजी दुपारच्या वेळेस त्याचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदरचा तरुण हा खेडमध्ये टायर रिमोल्ड वा पंक्चर काढण्याचा व्यावसायिक असल्याचे समजते. आकस्मिक मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही.
Comments
Post a Comment