इन्फिगो आयकेअर तर्फे आजपासून डोळे तपासणी शिबिर

 Eyes Photos, Download Free Eyes Stock Photos & HD Images

रत्नागिरी : येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात डोळ्यांच्या पडद्याची तपासणी शिबिर १४ नोव्हेंबरपासून सात दिवस विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत दिली.

मधुमेह असणाऱ्यांच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आह. सोमवारी, १४ रोजी संगमेश्वर येथील नावडी ग्रामपंचायत, १५ रोजी लांजा येथील संकल्पसिद्धी सभागृह, १६ रोजी चिपळूण येथील स्प्रिंग्ज क्लिनिक, १७ रोजी राजापूर येथील डॉ. जोशी हॉस्पिटल, १८ रोजी खेडमधील डॉ. धारिया हॉस्पिटल, १९ रोजी हर्णे (ता. दापोली) येथील माळेकर सभागृह तर दि. २० रोजी साखरपा येथील नाना शेट्ये सभागृहात हे शिबिर होणार आहे.

रक्तातील सततच्या अनियंत्रित साखरेच्या पातळीमुळे डायबेटिस असणाऱ्यांच्या डोळ्यांचा पडदा, किडनी, हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. डोळ्यांच्या पडद्यावर साखरेमुळे होणारे परिणाम हळूहळू दृष्टीनाश घडवून आणतात. यामुळे डोळ्यांत वारंवार जंतुसंसर्ग होणे, तरुण वयात मोतीबिंदू होणे, पडद्यावरील रक्तवाहिन्यांची हानी होऊन त्या ठिसूळ होणे असे प्रकार घडतात. ठिसूळ रक्तवाहिन्या साध्या खोकण्याने अथवा शिंकण्यानेसुद्धा क्वचित प्रसंगी फुटू शकतात. डोळ्यांत रक्तस्राव होतो. पडद्याला सूज येणे व छिद्र पडणे किंवा पडदा सरकणे असे नुकसान होऊ शकते. डायबेटीसमुळे होणारा दृष्टीनाश कायमस्वरूपी असतो.

डोळ्यांत थेंब घालून पडद्याची तपासणी व डोळ्यांचा ३D स्कॅन करून पडद्याचे झालेले नुकसान तपासून घेता येते व पुढील उपचार करता येतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोळे व रेटिना यावरील सुपर स्पेशालिटी सुविधा फक्त इन्फिगोमध्येच उपलब्ध आहेत.

रेटिनाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व लेझर उपचार सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत यांच्या वैयक्तिक सल्ल्याने केले जातात. डायबेटीस असणाऱ्या सर्वांची गैरसोय लक्षात घेऊन रेटीना तज्ज्ञ आपल्या गावात या अभियानाद्वारे "डॉ. प्रसाद कामत पडद्याची तपासणी व उपचार करणार आहेत. अत्याधुनिक जर्मन 3D स्कॅन आणण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास डोळ्याच्या पडद्याचा ३D स्कॅन ३ हजार रुपयांऐवजी शिबिराच्या दिवशी २ हजार रुपयांत करण्यात येणार आहे. नोंदणी करून या अमूल्य संधीचा लाभ घ्यावा. या तपासणीसाठी साधारण ४५ मिनिटे लागतात.. त्यामुळे पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९३७२७६६५०४, ९३७२७६६५०८, ९१३७१५५४९० येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Comments