दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता

रत्नागिरी : नोव्हेंबरच्या सुरुवातीस असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नोव्हेंबर महिन्यात वातावरणाच्या स्थितीत सातत्याने बदल होणार असून एकाच महिन्यात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असा त्रिस्तरीय ऋतची अनुभूती शक्य असल्याचा अहवाल आडाखा हवामान विभगाने बांधला आहे.
ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात किमान तापमानात झपाट्याने घट होऊन गारवा निर्माण झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही
बहुतांश भागांतील तापमानात घट होऊन पेठी अवतरली. या काळामध्ये आकाशाची स्थिती निरभ्र आणि कोरड्या हवामानाची निर्माण झाल्याने प्रामुख्याने किनारट्टीच्या भागात कोकण विभागामध्ये आणि विदर्भात काही भागांत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला. मात्र, गुरुवारपासून वातावरणात पुन्हा बदल सुरू झाला आहे. राज्याच्या बहुतांश भागात आता अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान सरासरीच्या जवळपास आले आहे. काही भागांत रात्रीही अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.
Comments
Post a Comment