महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा संपन्न

नवी मुंबई : महावितरणच्यावतीने आयोजित केलेल्या कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईच्या वतीने सादर करण्यात आलेल्या "सलवा जुडूम" हे नाटक विजेते ठरले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या तीन दिवसीय नाट्य स्पर्धेत महावितरणचे विविध परिमंडळातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा म्हणून महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचा आनंद घेत सर्वांमध्ये एक नौऊर्जा निर्माण झाल्याचे महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी सांगितले. महावितरण कर्मचाऱ्यांनी सादर केलेली नाटके ही व्यवसायीक तोडीची होती असे कौतुकास्पद शब्दात महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी सर्व कलाकारांना प्रोत्साहित केले.
तीन दिवस चाललेल्या या नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबई, भांडूप नागरी परिमंडल, कल्याण परिमंडल, नाशिक परिमंडल, जळगाव परिमंडल, कोकण परिमंडल, रत्नागिरी यांनी नाट्य कलाकृती सादर केली. स्पर्धेतील विजेते सर्वोत्तम नाटक निर्मिती सलवा जुडूम, (सांघिक कार्यालय), उपविजेते - 'आर्यमा उवाच' (जळगाव), दिग्दर्शन प्रथम जितेंद्र वेदक, (सांघिक कार्यालय), द्वितीय मयुर भंगाळे (जळगाव), अभिनय पुरुष प्रथम संदीप वंजारी (भांडुप), व्दितीय - अमित दळवी (सांघिक कार्यालय), अभिनय महिला प्रथम युगंधरा ओहोळ (जळगाव), व्दितीय वृषाली पाटील, = (कल्याण), रंगभूषा व वेशभूषा प्रथम - आर्यमा उवाच (जळगाव), व्दितीय सलवा जुडूम (सांघिक कार्यालय 1). संगीत: प्रथम सलावा जुडूम (सांघिक कार्यालय), व्दितीय आर्यमा उवाच (जळगाव), प्रकाश योजना: प्रथम सलवा जुडूम (सांघिक कार्यालय), व्दितीय आर्यमा उवाच (जळगाव), नेपथ्य: प्रथम सलवा जुडूम (सांघिक कार्यालय), व्दितीय आर्यमा उवाच (जळगाव), तसेच, उत्तेजनार्थ बक्षीस: किशोर साठे (सांघिक कार्यालय), शुभम सपकाळे (जळगाव), रुपाली पाटील (भांडुप), विक्रांत शिंदे (कल्याण), राम धर्मा थोरात (नाशिक), आलेखा शारबिद्रे (रत्नागिरी) आदींनी विविध पारितोषिके पटकाविली.
Comments
Post a Comment